सत्तारने सुप्रिया सुळेंचा अपमान केला, मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून हाकलला असता – ठाकरे 

बुलडाणा – सत्तांतरानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यात सभा घेतली. उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट होते . यावेळी  उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले,  अनेक महिन्यांनंतर वर्षांनंतर आपल्या दर्शनाला आलो आहे. दसरा मेळाव्यानंतरच आई जिजाऊंच्या जन्मस्थानी आशीर्वाद घेऊन सुरुवात करायची, म्हणून बुलढाण्यात आलो. आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षीत आहे का?  काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे.

काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगला शिवसैनिक. ते परत आले. आज सगळे काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे.

छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊ पणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला.

काल अमित शहा बोलले आम्ही धडा शिकवला. पण बाबरी पाडल्यावर शिवसेना उभी राहिली, अमरनाथ यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख उभे राहिले. आमच दैवताचा पुराने आदर्श म्हणून उल्लेख करतात. सत्तारने सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून हाकलला असता. महाराष्ट्राचा अपमान होतोय, देवतांचा अपमान होतोय तुम्ही सहन करता हे असले बाळासाहेबांचे विचार नाहीत.असं ते म्हणाले.