उर्फी जावेद अर्धनग्न कपडे का घालते? व्हिडिओ शेअर करत खुद्द अभिनेत्रीनेच दिलीय माहिती

Mumbai– मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद सध्या चव्हाट्यावर आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून तिच्याविरोधात पोलिसांत कारवाईची मागणी केली आहे. तर उर्फीही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. या दोघींमधील वाद चिघळत असतानाच उर्फी नेहमी अर्धनग्न कपडे का घालते?, याचे कारण सांगितले आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे याचा खुलासा केला आहे.

तर नेहमी रिव्हिलिंग कपडे घालणे ही उर्फीची आवड नसून ती असे करण्यासाठी मजबूर असल्याचे तिने सांगितले आहे. कारण उर्फीला कपड्यांची अॅलर्जी (Clothes Allergy) आहे.

होय, उर्फी जावेदने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या शरीरावरचे पुरळ दाखवले आहेत. तिच्या हातावर आणि पायावर खूप पुरळ उठले आहेत, त्यामुळे उर्फी खूप अस्वस्थ आहे. उर्फी जावेदने सांगितले की, तिच्या शरीराला कपड्यांची अॅलर्जी आहे. तिने पूर्ण कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर तिला पुरळ उठते. उर्फी म्हणाली की, “मी अंगभर कपडे का घालत नाही? कारण माझी प्रकृती गंभीर आहे. जेव्हा मी अंगभरुन कपडे घालते, तेव्हा माझे शरीर कपड्यांना रिऍक्ट करते आणि अंगावर असे फोड येतात.”