उर्फी जावेद ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात झालीय वेडी, त्याच्यामुळे आजही आहे सिंगल!

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Uorfi Javed) केवळ तिच्या ऑफबीट फॅशनसाठीच नाही तर तिच्या बिनधास्त स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे. ती तिच्या आयुष्याशी निगडीत कोणतेही सत्य लपवत नाही. अशातच आता तिने अलीकडेच तिच्या एका प्रेमाविषयी (Urfi Javed First Love) सांगितले, ज्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्याच्यामुळे उर्फी आजपर्यंत तिच्या आयुष्यात कोणत्याही मुलाला जागा देऊ शकलेली नाही.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शाहिद कपूर कसा तिचा पहिला क्रश होता? हे सांगणारी एक कथा लिहिली. उर्फी शाहिदवर पूर्णपणे प्रेम करत होती आणि शाहिदचे (Shahid Kapoor) लग्न झाल्यानंतर तिला रडू कोसळले होते. उर्फीने असेही सांगितले की, शाहिदनंतर तिने कोणावरही प्रेम केले नाही आणि म्हणूनच ती अजूनही सिंगल आहे. उर्फीच्या म्हणण्यानुसार, शाहिदशिवाय कोणताही मुलगा तिच्या आयुष्यात राहू शकत नाही.

तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये उर्फीने लिहिले, “२० वर्षांपूर्वी अगदी ९ मे रोजी जेव्हा इश्क विश्क रिलीज झाला तेव्हा मी शाहिद कपूरच्या प्रेमात पडले. मी 100 डायरीत फक्त त्याचे नाव लिहिले होते. मी माझ्या खोलीत शाहिदचे 100 पोस्टर्स लावले होते. पण त्याचे लग्न झाले तेव्हा मी खूप रडले. कदाचित हेच कारण आहे की मी आजपर्यंत इतर कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकले नाही. माझे आयुष्य २० वर्षांपूर्वी बदलले. हा चित्रपट गेम चेंजर ठरला. त्याचे संवाद आणि गाणी आजही समर्पक आहेत.”

शाहीदने मीरा राजपूतसोबत २०१५ मध्ये अरेंज मॅरेज केले होते. दुसरीकडे उर्फी जावेदचे नाव अनेक मुलांसोबत जोडले गेले आहे. ज्यामध्ये अनुपमा या मालिकेत काम केलेल्या पारस कलानवतच्या नावाचाही समावेश आहे. सध्या उर्फी स्वतःला सिंगल असल्याचे सांगते आणि ती तिच्या बोल्डनेससाठी खूप लोकप्रिय आहे.