Parth Pawar : पार्थ पवार यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट

Parth Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांचे (AJit Pawar) चिरंजीव पार्थ पवार यांनी मोक्का, खून, खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि मारणे टोळीचा म्होरक्या असलेल्या गजा मारणेची (Gaja Marne) घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे ते सध्या राजकीय टीकेचे (parth pawar meets gaja marne) धनी बनले आहेत.

बुधवारी संध्याकाळी पार्थ पवार हे गजानन मारणे याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत होते शहराध्यक्ष दिपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि माजी नगरसेवक बंडू केमसे आणि इतर राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. आता पार्थ पवारांवर एका गुंडाच्या घरी जाण्याची वेळ का आली असा प्रश्न आहे.

गजा मारणे हा पुण्यातल्या कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या आहे. गजा मारणे याच्यावर सहापेक्षा जास्त खुनाचे गुन्हे आहेत. 2 वेळा गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘काहीही झालं तरी झुकणार नाही’, ईडीकडून ११ तास चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया