पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले,….

मुंबई – एसटी कर्मचारी आज पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी आज धडक दिली .आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहे. सत्ताधारी नेते हे भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न करत  आहेत टर विरोधक देखील जशास तसे उत्तर देत आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो. असं ते म्हणाले.