बॉयफ्रेंडच्या डोळ्यात रेबीजची सुईच खुपसली.. दुसऱ्या मुलीकडे पाहिले म्हणून तरूणीने घेतला खतरनाक बदला!

Woman Stabs Needle In Boyfriend’s Eye : सध्या सोशल मीडियावर लोकांना हादरवून सोडणारी एक घटना घडली आहे, जी जाणून घेतल्यावर तुम्हालाही अश्रू अनावर होतील. ही घटना एका जोडप्याची आहे, जे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्यात असलेले प्रेम तेव्हा संपुष्टात आले, जेव्हा काही कारणावरून भांडण झाले आणि रागाच्या भरात प्रेयसीने प्रियकराच्या डोळ्यात रेबीजची सुई टोचली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

ही धक्कादायक घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. एक जोडपे गेल्या आठ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, मात्र गेल्या शनिवारी रात्री दोघांमधील भांडण इतके वाढले की, महिलेने हे भयानक पाऊल उचलले. nypost नुसार, मियामी-डेड काउंटीमधील एका घरात ही घटना घडली. तिचा प्रियकर इतर मुलींकडेही बघत असल्याचा राग महिलेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजता जोडपे त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर, प्रियकर सोफ्यावर झोपला होता, तेव्हा वाढत्या भांडणाच्या दरम्यान प्रेयसीने हातात रेबीजची सुई घेतली आणि त्याच्या उजव्या डोळ्यात वार केले.

असे सांगितले जात आहे की, वेदनेने ओरडत असलेल्या प्रियकराने पोलिसांना 911 वर माहिती दिली, त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून त्याला जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी 44 वर्षीय आरोपी सँड्रा जिमेनेझला अटक केली आहे. या संपूर्ण घटनेवर पीडित्याचे म्हणणे आहे की, त्याने हे इंजेक्शन आपल्या कुत्र्यांसाठी आणले होते, पण त्याच्या प्रेयसीच्या मनात काय चालले आहे याची त्याला कल्पना नव्हती.

महत्वाच्या बातम्य़ा-

मी इरफानसोबत रिलेशनमध्ये असताना गंभीर मला नियमित मिसकॉल करायचा; बॉलीवूड अभिनेत्रीचा उलगडा

‘कुणाच्या ताटाखालचे मांजर होण्याचे महाराष्ट्राच्या रक्तात नाही, मात्र आज…’, अजित पवारांचे वक्तव्य

शालेय पोषण आहारात अंडी नकोत : डॉ. कल्याण गंगवाल

Business Idea : ‘या’ फास्ट फूडचा व्यवसाय टाकून महिन्याला कमवू शकता लाखो रुपये