सिंचन घोटाळा प्रकरणी कारवाईचे नाटक,प्रत्यक्षात चौकशीच नाही ?

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी खळबळजनक ट्वीट्स केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Nawab Malik and Anil Deshmukh) यांना भेटणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. संबंधित ट्वीट जतन करून ठेवा, असा विश्वासही त्यांनी ट्वीटमधून व्यक्त केला आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

“माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. सोबतच सिंचन घोटाळा प्रकरणाची (Irrigation Scam Case) पुन्हा चौकशी झाली पाहिजे, 2019 मध्ये परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी चौकशी बंद केली होती!, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे.

याशिवाय मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचाी पोलखोल करणार आहे त्यात देशातील आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील मालमत्ता, विविध पोर्टफोलिओमध्ये मंत्री म्हणून केलेला भ्रष्टाचार ,कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्ता यादी!, अस ट्विट कंबोज यांनी केलंय.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असतानाच (Water Resources) जलसंपदा विभागाच्या माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या आरोपामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना नागपूर खंडपीठाने क्लिनचीट दिली असली तरी खंडपीठाने अद्यापपर्यंत ती मान्य केलेले नाही. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकते असेच पांढरे यांनी सूचित केले आहे.सिंचन घोटाळ्यात मोठा अपहार झाला असून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाईचे केवळ नाटक झाले असल्याचे म्हणत त्यांनी या प्रकरणाला वेगळ्या वळणावर नेले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी होणार के देखील पहावे लागणार आहे.TV9 ने याबाबत वृत्त दिले आहे.