विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

Pune  – माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शिवतारेंवर ठेवला आहे.

विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहे. ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करतात. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई कऱण्यात आली आहे. पक्षबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मातोश्रीवर बैठका घेण्याचा धडाकाच लावला आहे.