‘शरद पवारांचा खोटेपणा उघड झाला, पवारांकडून दुसरी अपेक्षा करणार तरी कशी ?’

पुणे – अहमदनगर रस्त्यावर एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे घडलेल्या हिंसाचार (Violence) प्रकरणापाठीमागे वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे व शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे (Milind Ekbote of ‘Samast Hindu Aghadi’ and Sambhaji Bhide of Shiv Pratishthan Sanghatana) असल्याचा आरोप घटना घडल्यापासून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President MP Sharad Pawar) यांनी जाहीर पत्रकार परिषदेत अनेक वेळा केला. मात्र, प्रत्यक्षात सदर हिंसाचाराच्या घटनेची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल (Former Justice J. N. Patel) यांच्या चौकशी आयोगासमोर (Commission of Inquiry) पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करत कोरेगाव भीमा येथे एकामागोमाग एक घडलेल्या घटनेबाबत मला वैयक्तिक कोणतेही ज्ञान अथवा माहिती नाही. या घटनेमागे कोणत्याही पक्षाचा अजेंडा किंवा उद्देश याबाबत माझे आरोप नसल्याचे स्पष्टीकरण देत स्वत:च्या भूमिकेवरून घूमजाव केले.

शरद पवार यांनी 18 सप्टेंबर 2018 रोजी आयोगासमोर पहिलं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्याच प्रतिज्ञापत्राला जोड म्हणून पवारांनी 11 एप्रिल रोजी दुसरं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2018 रोजी घडलेल्या घटनेविषयी आपल्याला काहीही माहिती नाही. दुर्देवी घटनेमागे कोणताही राजकीय अजेंडा किंवा हेतूविषयी माझे कुणावरही आरोप नाहीत, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. माझा सार्वजनिक जीवनातील एकंदरीत अनुभव आणि माहितीच्या आधारे आयोगाला मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पवारांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी  शरद पवारांचा खोटेपणा उघड झाला असे म्हणत शरसंधान केले आहे. ते म्हणाले, कोरेगाव भीमा दंगलीच्या निमित्तानं शरद पवार भाजपाला (BJP) बदनाम करण्यासाठी खोटं बोलत तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र होते असा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही (CM Uddav Thackeray) त्यांनी पत्र लिहिलं होतं. पोलिसांनी मूळ पुरावे नष्ट करून अनेक खोटे पुरावे तयार केल्याचा दावाही केला. परंतु आता या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पवारांनी आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. कुठल्याही राजकीय पक्षावर (Any Other political party) आरोप करायचा नाही असं प्रतिज्ञापत्र सादर केलंय.

त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याने केवळ राजकारणासाठी खोटेपणाचा वापर करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं आणि पत्रकार परिषद घेत सातत्याने भाजपाला बदनाम करावं हे दुर्दैवी म्हणावे लागेल. मात्र पवारांकडून दुसरी अपेक्षा करणार तरी कशी ? ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून आहे. असं उपाध्ये यांनी म्हटले आहे.