Suresh Prabhu | आव्हानांना सामोरे जाताना नव्या संकल्पना, विचारांचा अवलंब करा

Suresh Prabhu : ग्रामीण अर्थव्यवस्था समाजाचा कणा असला तरी पारंपरिक व्यवसाय, उद्योगांसमोर आज अनेक आव्हाने आहेत. आव्हानांचा सामना करताना उत्पन्न वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाबरोबरच नव्या विचारांनी, संकल्पनांनी नवे उद्योग सुरू करणे गरजेचे आहे. आपल्या भवतालातील गरज लक्षात घेऊन उद्योग, उपक्रम सुरू करावेत, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सहकारिता धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांनी दिला. नवा उद्योग सुरू करताना केवळ आरंभशूरपणा नको, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान आणि केअर फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 2) ‌‘सहकार से समृद्धी’ या उपक्रमाअंतर्गत स्टार्ट-अप कॉन्क्लेव आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रभू बोलत होते. शिवनेरी हॉल, व्हॅम्निकॉम, पुणे  येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास सहकारी संस्थांच्या अपर निबंधक डॉ. ज्योती मेटे, व्हॅम्निकॉमच्या संचालिका डॉ. हेमा यादव, दूरदर्शनचे केंद्र प्रमुख अजित बागल (Ajit Bagal) तसेच सेंटर फॉर आंत्रप्रुनर्शिप डेव्हलपमेंटचे प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत कदम (Prashant Kadam), केअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अवधूत कदम (Avadhoot Kadam), विनोद पातरकर (Vinod Patarkar) यांची प्रमुख उपस्थिती होती. स्टार्ट-अप आणि सहकारी संस्थांना एका मंचावर आणून त्यांना एकमेकांशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. यात राज्यातील 35 स्टार्ट-अप आणि 20 सहकारी संस्थांचे जवळपास 350 सदस्य सहभागी झाले होते. सहकारी संस्था उत्पादित वस्तूंची प्रदर्शनीही येथे भरविण्यात आली होती.

कृषी आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टार्ट-अप तसेच सहकार क्षेत्रातील एकूण 61 संस्थांचा प्रभू यांच्या हस्ते सुरुवातीस गौरव करण्यात आला.

सुरेश प्रभू पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील व्यवसाय वाढीसाठी साखर कारखाने, दूध उद्योग एवढ्यापुरते मर्यादित न राहता नाविन्यपूर्ण कल्पना राबविणे आवश्यक आहे. परिसरातील गरजा लक्षात घेऊन व्यवसाय सुरू केल्यास त्यात यश मिळणे शक्य असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्टार्ट-अप या संकल्पेची घोषणा केल्यानंतर या विभागाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या वेळी सुरू झालेले उद्योग यशस्वी झाले आहेत. सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी अनेक योजना आहेत. उद्योगासाठी भांडवल कसे उभे करायचे, सरकार कुठली उत्पादने खरेदी करते याचाही अभ्यास करा. नव्याने सुरू केलेली योजना नेटाने पूर्णत्वास न्या, मेहनत करा, जिद्द बाळगा, असेही ते म्हणाले.

सहकार आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठी आयोजित केलेला उपक्रम नवीन व्यावसायिकांना दिशा देणारा आहे, असे सांगून डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, सहकाराची मुहुर्तमेढ आपल्याकडे झाली आहे. स्टार्ट-अपच्या माध्यमातून देशाच्या जिडीपीत भर टाकणे काळाजी गरज आहे. ज्यायोगे देशाची उन्नती होईल. महिला, निवृत्त सैनिकांनी एकत्र येऊन ‌‘सहकारातून समृद्धी’ करून दाखविली आहे ही कौतुकाची बाब आहे.

सुरुवातीस डॉ. हेमा यादव यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत अवधूत कदम, प्रा. डॉ. प्रशांत कदम, डॉ. ज्योती मेटे यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर आभार अवधूत कदम यांनी मानले.

प्रथम सत्रात आयोजित चर्चासत्रात एमसीडीसीचे कार्यकारी संचालक मिलिंद अक्रे, आयएबीएचे संचालक विनोद पातरकर, केअर फाउंडेशनचे संचालक अवधूत कदम, विश्वस्त अतुल चव्हाण, प्रवीण अजबे, प्रा. डॉ. वाय. एस. पाटील, अभिजिंत शिंदे, सुहास जातेगांवकर, अमेय पातरकर यांचा सहभाग होता. प्रथम सत्रात उपस्थित मान्यवरांचे आभार आर. के. मेनन यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा