Tata Motors | वाहन विक्रीत लक्षणीय वाढ; टाटा मोटर्सच्या वाहनांना प्रचंड मागणी 

Tata Motors : जानेवारी २०२४ मध्ये मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स (Tata Motors), ह्युंदाई मोटर इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मारुती सुझुकीला गेल्या महिन्यात विक्रीचा विक्रमी आकडा गाठण्यात यश आले. कंपनीची एकूण वाहन विक्री जानेवारीमध्ये 15.5 टक्क्यांनी वाढून 1,99,364 युनिट्स झाली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,72,535 युनिट्स होती. ही त्याची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री होती. मारुती सुझुकीची एकूण देशांतर्गत विक्री 13 टक्क्यांनी वाढून 1,70,214 मोटारींवर गेली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात 1,51,367 युनिट्स होती.

देशांतर्गत वाहन उत्पादक टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात देशांतर्गत 84,276 युनिट्सची विक्री केली होती तर जानेवारी 2023 मध्ये हा आकडा 79,681 युनिट्स होता. त्याची एकूण वाहन विक्री वर्षभरात सहा टक्क्यांनी वाढून ८६,१२५ युनिट झाली. ह्युंदाई मोटर इंडियाची घाऊक विक्री जानेवारीमध्ये 8.5 टक्क्यांनी वाढून 67,615 युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 62,276 मोटारींची विक्री केली होती. Hyundai ची देशांतर्गत विक्री गेल्या महिन्यात 14 टक्क्यांनी वाढून 57,115 युनिट्सवर पोहोचली आहे जी मागील वर्षीच्या 50,106 युनिट्सवरून होती. टोयोटा किर्लोस्कर मोटरने जानेवारीमध्ये 24,609 वाहनांच्या डिलिव्हरीसह सर्वात जास्त मासिक विक्रीची नोंद केली. गेल्या वर्षीच्या 12,835 वाहनांच्या तुलनेत हे प्रमाण 92 टक्के अधिक आहे.

आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राची एकूण वाहन विक्री जानेवारीत 15 टक्क्यांनी वाढून 73,944 युनिट झाली आहे. त्याच वेळी, युटिलिटी वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या जानेवारीत 32,915 वाहनांच्या तुलनेत 31 टक्क्यांनी वाढून 43,068 युनिट्सवर पोहोचली आहे.

दरम्यान, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची दुचाकी विभागातील एकूण विक्री जानेवारीमध्ये 41.50 टक्क्यांनी वाढून 4,19,395 युनिट्सवर गेली आहे. या कालावधीत देशांतर्गत विक्री 37 टक्क्यांनी वाढून 3,82,512 युनिट झाली. आघाडीची मोटारसायकल उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डची विक्री जानेवारीमध्ये दोन टक्क्यांनी किरकोळ वाढून 76,187 युनिट्स झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने एकूण 74,746 वाहनांची विक्री केली होती. व्यावसायिक वाहन निर्माता अशोक लेलँडची एकूण विक्री सात टक्क्यांनी घसरून 15,939 वाहनांवर आली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 17,200 वाहनांची विक्री झाली होती.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा