‘राहुल गांधी नुसत्या पोकळ गप्पा मारतात आणि संधी देण्याची वेळ आली की नेत्यांच्याच मुलाला संधी देतात’

मुंबई – युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सुपुत्राची निवड करून पुन्हा एकदा काँग्रेस हा घराणेशाही चालवणाराच पक्ष आहे हे काँग्रेस ने सुस्पष्ट केले आहे. नेत्याचाच मुलगा नेता होईल आणि मंत्र्याचाच मुलगा युवक अध्यक्ष होईल ही परंपरा काँग्रेस ने पुन्हा एकदा जपली आहे अशी घणाघाती टीका भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे.

ते म्हणाले, सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना कामाला लाऊन काँग्रेसची मतदार नोंदणी करण्याचे काम कुणाल राऊत यांनी केले,त्याचे स्ट्रिंग ऑपरेशन भाजयुमो ने केले होते.परंतु दोषींवर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

सर्वसामान्य युवांना संधी देण्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी नुसत्या पोकळ गप्पा मारतात मात्र संधी देण्याची वेळ आली की नेत्यांच्याच मुलाला संधी देतात, यावरून काँग्रेस ची घराणेशाही ची मानसिकता वारंवार स्पष्टपणे दिसून येते व त्यामुळेच काँग्रेस चे आज अधःपतन होताना संपूर्ण देश बघत आहे.

नवनियुक्त युवक काँग्रेस अध्यक्ष यांना एक विनंती मात्र नक्की करणार आहे,की ज्याप्रमाणे आपल्या वडिलांची सरकारी यंत्रणा स्वतःच्या व काँग्रेसच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने आपण वापरलीत, आता स्वतः चां फायदा थोडासा बाजूला ठेऊन, तिच सरकारी यंत्रणा किमान महाराष्ट्रातल्या युवांच दुःख नाहीस करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी वापरता येते का हे पाहण्याचा प्रयत्न करावा.असं देखील पाटील यांनी म्हटले आहे.