Viral Video | चालकाचा ताबा सुटला आणि गर्दीने खचाखच भरलेल्या कचोरीच्या दुकानात शिरली कार, ६ जण जखमी

Viral Video | रस्त्यावरील अपघातांशी संबंधित दृश्ये सोशल मीडियावर रोजच पाहायला मिळतात. यामध्ये अनेक सीन्स आहेत जे पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतात. नुकताच दिल्लीतून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ एका वेगवान कारचा आहे, जी कचोरीच्या दुकानात घुसली. दुकानात आधीच लोकांची गर्दी होती. त्यामुळे अचानक आलेल्या एका कारने अनेकांना धडक दिली. या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील राजपूर रोडचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना ३१ मार्च रोजी घडली. त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे.

कार दुकानात शिरली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कचोरीच्या दुकानात अनेक ग्राहक दिसत आहेत. प्रत्येकजण कचोरी खाण्यात व्यस्त आहे. पण त्यांच्यासोबत एक भयंकर घटना घडणार आहे याची त्यांना फारशी कल्पना नव्हती. अचानक पांढऱ्या रंगाच्या वेगाने येत असलेल्या कारचा ताबा सुटून थेट कचोरी दुकानात घुसल्याचे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. कार दुकानात शिरताच अनेकांना धडक देते. काही लोक इकडे तिकडे उड्या मारून जीव वाचवताना दिसतात. या अपघाताचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

चालकाला अटक
ही घटना दिल्लीतील राजपूर रोडवर घडली. यामध्ये ६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे, पीएस सिव्हिल लाइन्समध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचा चालक पराग मैनी याला अटक करण्यात आली आहे. गाडीही जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार चालक दारूच्या नशेत नव्हता. मात्र, रक्ताचा नमुना विश्लेषणासाठी जतन करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका