विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर पाकिस्तान संघात भूकंप, दिग्गज क्रिकेटरचा राजीनामा

Pakistan World Cup 2023: भारताने आयोजित केलेल्या ICC एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सामने संपले आहेत. आता उपांत्य फेरीला सुरुवात होणार आहे. यावेळी या स्पर्धेत पाकिस्तान संघाची अवस्था खूपच वाईट झाली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली संघाने 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले आणि संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

पाकिस्तानचा संघही शेवटचा सामना खेळून मायदेशी पोहोचला आहे. मात्र यादरम्यान संघातही भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले आहे. वास्तविक, पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

संघाच्या नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाची लवकरच घोषणा 
आता पाकिस्तान क्रिकेट संघाला आपली पुढील मालिका ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळायची आहे. 14 डिसेंबरपासून हा दौरा होणार आहे. या कालावधीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लवकरच संघाच्या नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत