सत्ता काय ते यांना कळलेलं नाही म्हणून बडबड करतात; विश्वंभर चौधरी  यांची भाजपवर टीका 

Mumbai : देशभरात विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरु झाल्यानंतर भाजपवर (BJP) विरोधक टीका करत आहेत. प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा भाजपचा प्लान सुरु असल्याची टीका विरोधक करत असताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील तेदेखील संपून जातील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी केले.

यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला, असताना सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी सुद्धा भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपाला १९८४ साली लोकसभेच्या निचांकी म्हणजे फक्त २ जागा मिळाल्या होत्या. काॅग्रेसला तब्बल ४०५! तेव्हा पण काॅग्रेसनं आम्हीच शिल्लक राहू अशी घमेंडखोर भाषा केली नव्हती. हे उथळे सत्तेला नवे आहेत. सत्ता काय ते यांना कळलेलं नाही म्हणून बडबड करतात. उथळ पाण्याला खळखळाट फार.असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.