दुर्देवी! वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाईंचे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात निधन

Parag Desai Passes Away: सुप्रसिद्ध चहा व्यावसायिक पराग देसाई यांचे रविवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. देसाई वाघ हे बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक (Wagh Bakari) होते. त्यांचे वय अंदाजे 49 वर्षे होते. 15 ऑक्टोबर रोजी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला (Stray Dogs Attack) केला. यानंतर ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका नामांकित रुग्णालयात उपचार सुरू होते.

कुत्र्याच्या हल्ल्यामुळे खाली पडल्याने पराग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घराबाहेर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना शेल्बी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. शेल्बी हॉस्पिटलमध्ये एक दिवस निरीक्षण केल्यानंतर, त्यांना शस्त्रक्रियेसाठी झाइड्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, रविवारी उपचारादरम्यान ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला.

https://youtu.be/998aRUPfTUs?si=DPll8YgZEcjawCcs

महत्वाच्या बातम्या-

फिनिक्स मॉल ते वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल व मेट्रोसाठी डीपीआर करा – अजित पवार

कमाल, लाजवाब! कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने २० वर्षांनंतर न्यूझीलंडला विश्वचषकात केले पराभूत

राज्य सरकारच्या जाहिरातीवर चव्हाणांचा हल्लाबोल; मराठा आरक्षणासाठी संसदेत घटनादुरुस्ती करण्याची मागणी