बलात्कार करणाऱ्यांना सरकार नपुंसक बनवणार, नव्या कायद्यामुळे नवा वाद

मादागास्कर (Madagascar) हा आफ्रिकन खंडाच्या आग्नेय किनाऱ्यावरील एक देश आहे. या देशात बाल बलात्कार करणाऱ्यांविरोधात कायदा मंजूर झाला आहे. या कायद्यानुसार अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोषींना कास्ट्रेशनची शिक्षा होऊ शकते. म्हणजे बाल बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवण्याची शिक्षा.

असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मादागास्करच्या संसदेने या महिन्यात हा कायदा मंजूर केला. येथील सिनेटने म्हणजेच वरिष्ठ सभागृहाने गेल्या आठवड्यात त्याला मंजुरी दिली. आता त्याला उच्च घटनात्मक न्यायालयाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यावर राष्ट्राध्यक्ष आंद्रेस राजोएलिना (President Andres Rajoelina) यांची स्वाक्षरी करावी लागेल. डिसेंबर २०२३ मध्ये अध्यक्ष आंद्रेस राजोएलिना यांनी पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या सरकारने कायद्यात बदल सुचवले होते.

 

मादागास्करचे (Madagascar) न्याय मंत्री लँडी म्बोलोशिना यांनी सांगितले की, बाल बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे हे एक आवश्यक पाऊल आहे. ते म्हणाले की, 2023 मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे 600 गुन्हे नोंदवण्यात आले होते आणि एकट्या या वर्षी जानेवारी महिन्यात 133 गुन्हे दाखल झाले होते. मादागास्कर हा एक सार्वभौम देश आहे ज्याला लोकांच्या हितासाठी त्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे. विद्यमान दंड संहिता या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुरेशी नाही.

या कायद्यानुसार 10 वर्षांखालील मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना शस्त्रक्रियेद्वारे नपुंसक बनवण्याची शिक्षा दिली जाईल. 10 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणांमध्ये, दोषीला शस्त्रक्रिया किंवा रासायनिक कास्ट्रेशनची शिक्षा दिली जाईल. 14 ते 17 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलांवर बलात्कार केल्यास केमिकल कॅस्ट्रेशनची शिक्षा होईल. याशिवाय लहान मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षाही भोगावी लागणार आहे.

मादागास्करच्या या कायद्यावर वाद सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने या नव्या कायद्यावर टीका केली आहे. यानुसार कायद्याने पीडितांच्या सुरक्षेवर भर दिला पाहिजे. मात्र, मादागास्करमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते ‘रेप कल्चर’ला आळा घालण्यासाठी हे करणे योग्य आहे.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज