मला ग्रामीण भागाशी संबंधित मंत्रिपद द्या – बच्चू कडू

पुणे : प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Prahar president and MLA Bachchu Kadu) यांनी महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं, अशी आशा व्यक्त केलीय. शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
गटासोबत बच्चू कडूही सुरत-गुवाहाटीमार्गे गोव्यात दाखल झाले होते. त्यांना शिंदे गटाचे समर्थक मानले जात आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळतं का आणि कुठलं मंत्रिपद मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नव्या मंत्रिमंडळात आपल्याला जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद (Cabinet Minister for Water Resources, Agriculture or Rural Development) मिळावं, अशी मागणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे असं समजतंय. ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण विभागासह बऱ्याच विभागांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. आता त्यांनी आपल्याला ग्रामीण विभागाशी (rural areas) निगडीत विभाग मिळावा तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

येत्या आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपा, अपक्ष, शिंदे गट व इतर छोट्या पक्षांचे अनेक आमदार मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रत्येक आमदार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे.मात्र, सर्व मिळून ४३ मंत्रीपदे आहेत.त्यापेक्षा जास्त मंत्री करता येत नाहीत. त्यामुळे शिंदे गट, अपक्ष व छोट्या पक्षांच्या अपेक्षा पाहता भाजपाच्या (BJP) आमदारांना मोठ्याप्रमाणात त्याग करावा लागणार असल्याचे दिसत आहे.