मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असताना काय केलं? मराठा आंदोलकांचा चव्हाणांना थेट सवाल 

Maratha Reservation- राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे यांच्या नव्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. शनिवारी ( ९ सप्टेंबर ) काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

धर्माबाद येथे एका बैठकीला अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हजेरी लावली.बैठक संपल्यानंतर अशोक चव्हाण आणि अन्य नेते कार्यक्रमस्थळाच्या बाहेर पडले. त्यावेळी संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून अशोक चव्हाण यांना घेराव घातला. काँग्रेसची बैठक का घेतली? मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असताना काय केलं? असे प्रश्न कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांना विचारले. “मराठा समाजाचा असताना धर्मादाबादमध्ये सभा घेण्याची गरज नव्हती. त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो,” असं एका समाजाच्या मराठा कार्यकर्त्यानं म्हटलं.

त्यावर, “मी तुमचा निषेध करतो. तू मला सांगू नको”, असं अशोक चव्हाण म्हणाले. यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांविरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांचा रोष पाहून अशोक चव्हाण पोलीस बंदोबस्तात निघून गेले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – छगन भुजबळ

तुम्ही PIN शिवाय 500 रुपये पाठवू शकता, Paytm वर UPI Lite सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

पाकिस्तान जिंकेल वनडे विश्वचषक, शोएब अख्तरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, भारत…

रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस