पुणे पोलिसांना झालंय तरी काय? प्यायला पाणी मागितले तर… पोलीस म्हणाले ‘मूत पी’

पुणे : पोलिसांच्या (Pune Police) मानसिकतेबाबत गांभीर्याने विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. घर मालकाच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मगरपट्टा पोलीस चौकीमध्ये घडली.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेले तहान लागल्यावर प्यायला पाणी मागितले असता तिला पोलिसांनी ‘मूत पी’ असे म्हणत उपनिरीक्षकासह चार पोलिसांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यामध्ये दोन महिला पोलिसांचा देखील समावेश आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधित पोलिसांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, हडपसर पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून याविषयी बोलण्यास कोणीही तयार नसल्याचे चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया