शिंदेंची शिवसेना पुढे काय करणार? आदित्य ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत सांगूनच टाकलं…

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गटाकडून वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) ४० आमदारांना गद्दार म्हणून संबोधले जात आहे. आता यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठे भाष्य केले आहे. जळगावातील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पाठिंबा देण्याचे कारण सांगितले आहे.

होय आम्ही गद्दारी केली, पण एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी कबुली दिली आहे. एकनाथ शिंदे मराठा आहे, त्यांच्यासाठी मी हा त्याग केला, गद्दारी केली असे गुलाबराव म्हणाले. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो, यातच मतदारसंघाचा जयजयकार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

त्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मी आधीच सांगितले आहे, प्रत्येक सभेत सांगत आलो आहे. की त्यांचा पुढचा प्रयत्न हा जातीजातीत आणि धर्माधर्मात वाद निर्माण करायचा. याकडे कुणीही लक्ष देऊ नका.त्यांच्याकडे आता आरोप करायला काहीही राहिले नाही म्हणून धर्माधर्मात आणि जातीजातीत वाद निर्माण करण्याचे काम ते करत राहतील. निवडणूक आल्यावर त्यांच्याकडे बोलायला काहीही शिल्लक राहिले नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.