उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असल्याचं सांगत भाजप, प्रहारमधील कार्यकर्ते ठाकरे गटात 

सोलापूर – राज्यात शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांचे नेते फोडण्यात व्यस्त आहेत. राज्यात अनेक ठिकाणचे ठाकरे गटातील नेते शिवसेनेत प्रवेश करत असताना शिवसेनेचा मित्र पक्षातील सोलापुरात भाजपासह (BJP) प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात (Thackeray Faction) प्रवेश केला आहे.

माजी आमदार रविकांत पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यकर्त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे आता सोलापूरच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार की नाही ते आता आगामी काळातील निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट होणार आहे.