पंधरा वर्षांची असताना त्याने उर्फीचा फोटो पॉर्न साइटवर अपलोड केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

मुंबई- सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Uorfi Javed) केवळ तिच्या ऑफबीट फॅशनसाठीच नाही तर तिच्या बिनधास्त स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे. ती तिच्या आयुष्याशी निगडीत कोणतेही सत्य लपवत नाही. अशातच आता तिने अलीकडेच तिच्या भूतकाळावर प्रकाश टाकला आहे. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत उर्फीने तिच्यासोबत घडलेले काही किस्से सांगितले. उर्फी १५ वर्षांची असताना एका व्यक्तीने तिचा फोटो पॉर्न साइटवर अपलोड केला होता.

उर्फी जेव्हा १५ वर्षांची होती तेव्हा एका व्यक्तीने तिचा फोटो पॉर्न साइटवर अपलोड केला होता. “माझ्या फेसबुक प्रोफाइलवरील तो साधाच फोटो होता. त्यामध्ये मी ट्युब टॉप घातला होता. तो फोटो एकाने पॉर्न साइटवर तसाच अपलोड केला. हळूहळू अनेकांना त्याबद्दल समजू लागलं होतं. तेव्हा सगळेजण मलाच दोष देऊ लागले होते. मी पॉर्न स्टार आहे असं ते मला हिणवू लागले. दोन वर्षांपर्यंत मी हे सगळं सहन केलं होतं”, असं उर्फी म्हणाली.