“हिंदूत्वाची युती टिकविण्यासाठी शिंदे भाजपासोबत आले तेव्हा त्यांना न मागता मुख्यमंत्रीपद दिले”

BJP Is Like Big Brother In Mahayuti:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख आहेत हे कुणीच नाकारू शकत नाही, परंतु, महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपाचे सर्वाधिक आमदार, खासदार आहेत. अधिकाधिक लोकप्रतिनिधी असणारा पक्ष हा मोठा असतो, असा विचार जनता करीत असल्याने महायुतीमध्ये भाजपाची (BJP) भूमिका ‘मोठा भाऊ’ (Big Brother) हीच आहे, असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले. २०२४ पर्यंत शिंदे हेच मुख्यमंत्री असतील.

बुधवारी (दि. ४) रोजी त्यांनी सातारा लोकसभा प्रवासादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, एनडीए आघाडीत भाजपाने घटक पक्षांना जपण्याचे काम केले. भाजपाकडून घटक पक्षांना जो सन्मान दिला जातो तो कॉंग्रेसमध्ये मिळू शकत नाही. जेव्हा मूळ हिंदूत्वाची युती टिकविण्यासाठी एकनाथ शिंदे भाजपासोबत आले तेव्हा त्यांना न मागता मुख्यमंत्रीपद भाजपाने दिले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, सातारा लोकसभा महायुतीचीच उमेदवार निवडून यावा, असा निश्चय भाजपाने केला आहे. पक्षाचे ‘सुपर वॉरिअर्स’ प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ६०० घरी पोहचतील व मविआने जनतेत पसरविलेला संभ्रम दूर करतील.

प्रदेशाध्यक्षांच्या प्रवासात प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, अमर साबळे, धैर्यशील कदम, शिवेंद्र राजे भोसले, जयकुमार गोरे, अतुल बाबा भोसले, मदन दादा भोसेले, नरेंद्र पाटील, रवींद्र अनासपुरे, मकरंद देशपांडे, डॉ. प्रियाताई भोसले, विजयाताई भोसले, सुरभीताई भोसले, रामकृष्ण वेताळ, रोहिदास पिसाळ, दीपक ननावरे, विवेक भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole