“तो मागून आला आणि त्याने माझे स्तन दाबले”, अभिनेत्री सोनम कपूरने सांगितलेला धक्कादायक प्रसंग

Sonam Kapoor Molest : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. अनिल कपूरची मुलगी खूप आलिशान आयुष्य जगते. पण तुम्हाला माहित आहे का की सोनम कपूर लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे. 13 वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच केला होता.या घटनेने अभिनेत्री प्रचंड घाबरली होती. अभिनेत्रीला वाटले की आपलेच काहीतरी चुकीचे केले आहे, त्यामुळे तिने याबद्दल कोणालाच सांगितले नव्हते.

‘तो माझ्यासाठी आघात होता…’
राजीव मसंदच्या शोमध्ये अभिनेत्रीने संपूर्ण घटनेबद्दल सांगितले होते की, त्या दिवशी तिच्यासोबत काय झाले होते. अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येकजण बालपणात कधी ना कधी लैंगिक शोषणाचा बळी ठरतो. मला माहित आहे की माझ्या लहानपणी माझाही विनयभंग झाला होता आणि तो माझ्यासाठी खूप मोठा आघात होता. सुमारे दोन-तीन वर्षे मी याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. ती घटना मला आजपर्यंत पूर्ण आठवते.’

वयाच्या 13व्या वर्षी विनयभंग
अभिनेत्रीने सांगितले की, ‘ही घटना मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमधील आहे जिथे ती तिच्या मैत्रिणींसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. सर्व लोक काही खाण्याचे साहित्य घेण्यासाठी बाहेर आले होते तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्याने माझे स्तन दाबले. हे उघड आहे की मी तेव्हा तरुण होते, त्यामुळे माझा फिगर आतासारखा नव्हता. पण जेव्हा माझ्यासोबत हे घडलं तेव्हा मी खूप घाबरून गेले होते. मला काय होत आहे ते समजले नाही आणि मी तिथेच रडायला लागले. पण मी याबद्दल कोणाशीही बोलले नाही. मी परत आत बसले आणि संपूर्ण चित्रपट पाहिला कारण त्यावेळी मला वाटले की मी काहीतरी चूक केली आहे.’