बर्फ वितळल्यावर कैलाश पर्वतावर ऐकू येतो मृदंगाचा नाद! जाणून घ्या भगवान शिवच्या भूमीविषयी रंजक गोष्टी

Mount Kailas: हिंदू धर्मात कैलास पर्वताला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या पर्वतावर भगवान शिवाचे (Lord Shiva) निवासस्थान आहे. कैलास पर्वत हिमालयाच्या उत्तरेकडील प्रदेश तिबेटमध्ये आहे, कारण हा प्रदेश तिबेट-चीनच्या सीमेत येतो, म्हणून कैलास पर्वत देखील चीनमध्ये येतो. कैलास पर्वत तिबेटमध्ये स्थित आहे, जेथे त्याचे नाव कांग रामपोचे आहे, म्हणजे मौल्यवान रत्न. चला जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी…

सर्वत्र एक अलौकिक शक्ती (A supernatural power everywhere)

कैलास पर्वत आणि त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ झार निकोलाई रोमानोव्ह आणि त्यांच्या टीमने तिबेटच्या मंदिरांमधील धर्मगुरूंशी चर्चा केली; तेव्हा त्यांनी सांगितले की कैलास पर्वताभोवती एक अलौकिक शक्ती वाहत आहे. या शक्तीच्या मदतीने आजही संन्यासी आध्यात्मिक गुरूंशी टेलिपॅथिक संपर्क करतात.

वेळ वेगाने जातो (Time goes fast)

तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, पण कैलास पर्वतावर वेळ झपाट्याने जातो. असा अनुभव येथे येणाऱ्या अनेक प्रवाशांनी घेतला आहे. येथे पोहोचल्यानंतर प्रवासी आणि शास्त्रज्ञांनी त्यांचे केस आणि नखे वेगाने वाढताना पाहिले आहेत. या आधारे कैलास पर्वतावर वेळ अधिक वेगाने जात असल्याचा त्यांचा अंदाज आहे. मात्र, आतापर्यंत यामागील कारणे शोधण्यात शास्त्रज्ञांना अपयश आले आहे.

रहस्यमय भौगोलिक स्थान (Mysterious geographic location)

कैलास पर्वताची उंची सुमारे ६७१४ मीटर आहे. दृष्यदृष्ट्या, त्याच्या शिखराचा आकार एका मोठ्या शिवलिंगासारखा आहे, ज्यावर वर्षभर बर्फाची पांढरी चादर लपेटलेली असते. या पर्वतावर चढणे निषिद्ध मानले जाते, परंतु ११व्या शतकात तिबेटी बौद्ध योगी मिलारेपा यांनी पर्वतावर चढाई केली होती. मात्र, याविषयी ते कधीच कोणाशी बोलले नाहीत, त्यामुळे ही बाबही आजपर्यंत गुलदस्त्यात आहे. रशियन शास्त्रज्ञांचा हा अहवाल ‘अनस्पेशल’ मासिकाच्या जानेवारी २००४ च्या अंकातही प्रसिद्ध झाला होता.
उन्हाळ्यात मान सरोवराचा बर्फ वितळला की वेगळाच आवाज ऐकू येतो. हा आवाज मृदंग सारखा वाटतो. तो मृदंगाचा नाद असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सूर्योदयाच्या वेळी, जेव्हा सूर्याची किरणे कैलास पर्वताच्या थंड पर्वतावर पडतात तेव्हा एक विशाल स्वस्तिकाचा आकार तयार होतो.