‘मुख्यमंत्र्यांशी व्यावहारिक संबंध असलेले हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत?’

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. ठाकरे सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर शुक्रवारी किरीट सोमय्या (kirit somayya) यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. तसंच हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी (nandkishor chatruvedi) यांना कुठे लपवलंय? असाही प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, नंदकिशोर हे उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर आहेत. त्यांच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी मनी लाँड्रींग केलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत? हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं.

आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) , तेसज ठाकरे(Tejas Thackeray) , श्रीधर पाटणकर (shridhar patankar) या सगळ्यांसोबत नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचं बाहेर आलं आहे असाही आरोप आज किरीट सोमय्यांनी केला. मी जे तपास यंत्रणांच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते शोधत आहेत कारण नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे. हवाला किंग एंट्री ऑपरेटर ठाकरे सरकारचे बिझनेस पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी यांना भगौडा तरी घोषित करा अशी आमची मागणी आहे.

चतुर्वेदी यांनी कोट्यवधींचं मनी लाँड्रींग (Money laundering) केलं आहे. सुमारे ३० कोटीचं मनी लाँड्रींग करण्यात आलं आहे. सोमय्या यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.