‘या’ २२ वर्षीय अष्टपैलूसाठी दिल्ली कॅपिटल्सने खर्च केले २ कोटी, काय आहे या क्रिकेटरची खासियत?

Who is Annabel Sutherland: WPL 2024 लिलावात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर ऍनाबेल सदरलँडवर पैशांचा वर्षाव करण्यात आला. या 22 वर्षीय अत्यंत प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूवर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) लिलावात आपली संपूर्ण तिजोरी रिकामी केली. अनाबेलने महिला प्रीमियर लीगच्या लिलावात 40 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह प्रवेश केला होता. दिल्लीने तिला 2 कोटी रुपयांना करारबद्ध केले. अनाबेलला लिलावात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला कडवी टक्कर दिली. 2.25 कोटींची पर्स असलेल्या दिल्लीने या ऑस्ट्रेलियन खेळाडूवर 2 कोटी रुपये खर्च केले यावरून ऍनाबेल ही खेळाडू किती मोठी आहे?, याचा अंदाज येतो.

WPL 2024 च्या लिलावात मुंबईने ऍनाबेलसाठी 1.9 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली पण त्यानंतर विजय दिल्लीकडे गेला. ऍनाबेल सदरलँडचा जन्म 12 ऑक्टोबर 2001 रोजी झाला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये तिने इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिला पदार्पणाच्या टी20 मध्ये एकही विकेट मिळाली नाही पण तिने आतापर्यंत 22 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिच्या नावावर टी20 मध्ये 10 विकेट आहेत. ऍनाबेलने 23 एकदिवसीय सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत तर 3 कसोटीत तिच्या नावावर 6 विकेट्स आहेत. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असण्यासोबतच ऍनाबेल एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहे.

ऍनाबेलला गेल्या मोसमात 70 लाख रुपये मिळाले होते
ऍनाबेल सदरलँडने फलंदाजी करताना टी-20मध्ये 97 धावा केल्या आहेत, तर वनडेमध्ये तिच्या नावावर 342 धावा आहेत. तिने कसोटीच्या पाच डावात 170 धावा केल्या आहेत. WBBL च्या पहिल्या सत्रात सदरलँड गुजरात जायंट्सचा भाग होती. पहिल्या सत्रात तिने 4 सामने खेळले. त्यानंतर तिला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. या काळात तिने गोलंदाजीत 3 बळी घेत 28 धावा केल्या. ती 70 लाख रुपयांमध्ये गुजरात जायंट्समध्ये सामील झाली.

ऍनाबेल सदरलँडने WBBL मध्ये छाप सोडली
ऍनाबेल सदरलँडने महिला बॅश लीग 2023 च्या या हंगामात चमकदार कामगिरी केली होती. मेलबर्न स्टार्सकडून खेळताना तिने सर्वाधिक 228 धावा केल्या. यादरम्यान तिने 23 बळी घेतले. मॅग लॅनिंगच्या अनुपस्थितीत तिने ऑस्ट्रेलियाचे 3 सामन्यात नेतृत्व केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंदापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Rajeshwari Kharat And Somnath Awghade : अखेर ‘जब्या’ला काळी चिमणी घावली! ‘शालू’सोबत जुळले प्रेमाचे धागे?

भाजप आमदार IASसोबत बांधणार लगीनगाठ; ३ राज्यांत रिसेप्शन, ३ लाख जणांना आमंत्रण