ऋतुजा लटके यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करणारे कोण आहेत मुरजी पटेल?

मुंबई – अंधेरी-पूर्वची जागा यापूर्वी शिवसेनेकडे (Shivsena) असल्याने या जागेवर शिंदे गटाकडून दावा केला जात होता. त्यामुळे मुरजी पटेल (Murji Patel) नेमकं कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत निश्चित नव्हतं. पण, काल (13 ऑक्टोबर) सायंकाळी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ashish Shelar and CM Eknath Shinde) यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झालं आहे. मुरजी पटेल यांनाही यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

कोण आहेत मुरजी पटेल? (Who is Murji Patel)

मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिले आहेत. अतिशय अभ्यासू आणि जनमानसातील नेता अशी त्यांची ओळख आहे. दांडगा जनसंपर्क हा देखील त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. पटेल 2019 मध्ये लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत रमेश लटके (Ramesh Latke) यांनी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र उल्लेखनीय बाब अशी की अपक्ष निवडणूक लढवूनही पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती. पटेल ‘जीवन ज्योत प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांची आपल्या भागावर घट्ट अशी पकड आहे. त्यांना मानणारा आणि जाणणारा असा एक वर्ग आहे.