उद्धव ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे सर्व चुका पोटात घेतात – सुप्रिया सुळे 

Mumbai – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.  यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललाआहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला.

या सर्वांनी आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये (Radisson Hotel) मुक्काम ठोकला असून रोज काही आमदार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दुसऱ्या बाजूला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे कौतुक केले आहे.  उद्धव ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे सर्व चुका पोटात घेतात. जेथे नाती असतात तेथे जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदारांच्या सर्व चुका विसरून पुन्हा त्यांना पक्षासोबत घेण्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तयार आहेत. एवढेच नाही तर सर्वांना माफ करायला देखील उद्धव ठाकरे  तयार आहेत. असं त्या म्हणाल्या.

कुटल्याही कुटंबात भांड्याला भांड लागतचं. परंतु, त्यानंतर आपापसातील सर्व मतभेद विसरून कुटुंब एकत्र येते. उद्धव ठाकरे यांनी आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे तर बंडखोर आमदारांनी परत यावे, असे आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी केले आहे. जे आज राष्ट्रवादीला (NCP) दोष  देत आहेत ते या पूर्वी राष्ट्रवादीत होते. आम्ही पण पक्ष सोडले पण आजही आमच्यात प्रेम आहे. एकत्र ताटात  जेवलो असेल तर त्या मिठाला  जागण्याची माझी सवय आहे, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले.