टायगर ग्रुपचे सर्वेसर्वा पै.तानाजी जाधव कोण आहेत ? टायगर ग्रुप नेमकं काय काम करतो ?

करमाळा –करमाळा – करमाळा तालुक्यातील पैलवान तानाजी जाधव (tanaji jadhav) हे नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आज या लेखाच्या माध्यमातून आपण त्यांच्याबाबत जाणून घेणार आहोत.  (Tanaji Jadhav’s story) . तानाजी जाधव यांचा जन्‍म 2 नोव्हेंबर 1986 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यामध्ये झाला. घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. त्या परिस्थितीवर परिस्थितीवर ती मात करताना तानाजी भाऊंनी पडेल ते काम केले. ते वडीलाना नेहमी मदत करत असत. तानाजी भाऊ शिक्षण सातवीपर्यंत जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये झालेले त्यानंतरचं शिक्षण हे highschool शाळेमध्ये झाले.

गुगलवर उपलब्ध माहितीनुसार,तानाजी यांना  लहानपणापासून त्यांना मित्र जोडण्याची आवड होती.  मोठे बंधू जालिंदर जाधव यांनी टायगर ग्रुप ची स्थापना (Establishment of Tiger Group) केल्यानंतर पुढे तानाजी जाधव यांनी त्या ग्रुपचा विस्तार केला.आज राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर देखील या ग्रुपच्या शाखा आहेत. तानाजी भाऊ यांचा स्वभाव अत्यंत शांत स्वभाव आहे आणि विचार करायची पद्धत खूप वेगळी आहे. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे हा ग्रुप अल्पावधीतच चर्चेत आला.  अनिकेत घुले यांच्यासोबत देखील त्यांची विशेष मैत्री आहे. त्यांची देखील तानाजी जाधव यांना मोलाची साथ मिळाली आहे.

टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याची स्थापना जालिंदर जाधव (Jalinder Jadhav) 2006 साली केली. टायगर ग्रुप ची(Tiger Group) स्थापना करण्याचा उद्देश हा होता की, मित्रांचा सर्वात मोठा ग्रुप तयार करून एकमेकाच्या समस्या सोडवणे हा होता. नंतर टायगर ग्रुप ची सर्व सूत्रे तानाजी भाऊ जाधव यांच्या हाती आली तानाजी जाधव टायगर ग्रुप वाढवण्यासाठी खूप काम केले. विशेष म्हणजे अमेरिकन युनिव्हर्सिटी मार्फत त्यांना  डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे.

टायगर ग्रुप नेमकं काय काम करतो ? (What exactly does Tiger Group do?)  

एकदा तानाजी जाधव माध्यमांशी बोलताना त्यांचा ग्रुप नेमका काय काम करतो हे सांगितले होते. ते म्हणाले होते की, टायगर ग्रुप चे काम संपूर्ण देशात सुरू आहे. कोरोना काळात दीड हजार मयत रुग्णांवर टायगर ग्रुप च्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी टायगर ग्रुप ने मोठे काम केले. शिवाय परदेशात अडकलेले लाखो भारतीय नोकरदारांना आपल्या माय देशात आणण्यासाठी टायगर ग्रुप मोठे नियोजन केले. जवळपास एक कोटी मास्क वाटले. जवळपास एका वेळी तीनशे ठिकाणी रक्तदान करून 20000 रक्तपिशव्या उपलब्ध करून दिल्या. या सर्व कामाची दखल घेऊन नेल्सन मंडेला यांच्या नावाने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा शांतता पुरस्कार मला मिळाला आहे.

त्याचबरोबर मला सोशल वर्कर म्हणजेच सामाजिक काम आत्मिक दिलेले योगदान याची दखल घेऊन अमेरिकन युनिव्हर्सिटी मार्फत मला डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे. या सर्व पुरस्काराला मी पात्र होण्यासाठी टायगर ग्रुपच्या तमाम देशातील कार्यकर्त्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून प्रामाणिकपणे समाजसेवेची बांधिलकी ठेवली याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. आज मला डॉक्टरेट व 120 देशातील शांततेचा नेल्सन मंडेला पुरस्कार मला मिळाला. टायगर ग्रुपचे भाग्य आहे. इथून पुढे अजून जास्त वेगाने समाजसेवेचे काम करणार असल्याचं त्यांनी सांगितले होते.

पै. तानाजी जाधव बर्थडे (tanaji jadhav birthday)

2 नोव्हेंबरला तानाजी भाऊ यांचा बर्थडे साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशातील चाहते त्यांचा  बड्डे साजरा करण्यासाठी करमाळा येथे येतात. यावेळी देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो.