मुले त्यांच्या Female Bestieच्या प्रेमात का पडतात? ‘या’ कारणांमुळे मुलांच्या मनात तयार होतात भावना

असे म्हणतात की, मुले मुलींना आणि मुली मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. म्हणूनच कॉलेजमध्ये असो वा कामाच्या ठिकाणी सहसा मुलींचा एक मेल बेस्ट फ्रेंड (Male Bestfriend) आणि मुलांची एक फिमेल बेस्टफ्रेंड (Female Bestfriend) असतेच. मात्र मैत्रीतील जवळीक वाढत गेली की, मुलांच्या मनात त्यांच्या फिमेल बेस्टीविषयी मैत्रीपलीकडे भावना निर्माण होऊ लागतात. मुलींच्या बाबतीत असे फार कमी प्रमाणात घडते. याउलट अधिकतर मुले त्यांच्या बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडताना दिसतात. यामागे विविध कारणे असू शकतात.

भावनिक संबंध:
मुलगा आणि त्याची फिमेल बेस्टी यांच्यात आधीपासूनच मजबूत भावनिक संबंध आणि विश्वास असल्याने, त्यांच्यातील मैत्री रोमँटिक नातेसंबंधात बदलू शकते. दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांचे भावनिक संबंध खूप जवळचे बनलेले असतात. त्यामुळे मुलांच्या मनात त्यांच्या फिमेल बेस्टफ्रेंडबद्दल मैत्रीच्या पलीकडे एक भावना निर्माण होऊ शकते.

एकमेकांच्या आवडीनिवडींमधील समानता:
सहसा आपण अशाच व्यक्तीशी मैत्री करतो, ज्याच्याशी आपला स्वभाव, आपल्या आवडीनिवडी जुळत असतील. जर मुलगा आणि त्याच्या फिमेल बेस्टफ्रेंडला समान गोष्टी आवडत असतील, त्यांचा स्वभाव एकसारखा असेल, त्यांचे छंद सारखेच असतील, तर समान आधारावर नाते निर्माण करणे सोपे होऊ शकते.

सांत्वन आणि परिचितता:
मुले वरुन दिसायला जरी कणखर असली तरी त्यांचे मन मात्र खूप हळवे असते. अशात जर एखाद्या हळव्या क्षणी मुलाला त्याच्या फिमेल बेस्टफ्रेंडकडून सांत्वना मिळाली, तर त्याच्या मनात तिच्याविषयी एक वेगळी भावना निर्माण होऊ शकते. तिच्याशी मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करायला त्याला अधिक सोयीस्कर वाटू शकते. अशावेळी अनोळखी व्यक्तीपेक्षा आपण जिला खूप जवळून ओळखतो त्या फिमेल बेस्टफ्रेंडलाच डेट करणे त्यांना बरोबर वाटते.

शारीरिक आकर्षण:
काहीवेळा, एखाद्या मुलाच्या मनात त्याच्या सर्वात चांगल्या मैत्रिणीबद्दल भावना निर्माण होऊ शकतात, कारण तो तिच्याकडे शारीरिकदृष्ट्या आकर्षित होतो. हे तिचे व्यक्तिमत्व, विनोदबुद्धी किंवा इतर आकर्षक गुणांमुळे होऊ शकते.

असे असले तरीही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व मुलांमध्ये त्यांच्या फिमेल बेस्टीबद्दल रोमँटिक भावना निर्माण होत नाहीत. कोणत्याही नातेसंबंधात सीमांचा आदर करणे आणि खुलेपणाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे.

(सूचना- हा लेख सामान्य माहितीसाठी असून त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. आझाद मराठी त्याची पुष्टी करत नाहीत)