Ramtech LokSabha 2024 | कॉंग्रेसची फजिती; पर्यायी उमेदवाराला बनवावे लागणार अधिकृत उमेदवार

रामटेक लोकसभा मतदारसंघात (Ramtech LokSabha 2024) रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यानंतर कॉंग्रेस पक्षाकडून पर्यायी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले श्यामराव बर्वे यांचं नाव आता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं असून खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी 1 एप्रिल रोजी ठेवली आहे.

दरम्यान, निवडणूक (Ramtech LokSabha 2024) आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवल्यानंतर रश्मी बर्वे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.दरम्यान, अर्ज बाद झाला असला तरी बर्वे माघार घ्यायला तयार नाहीत. त्या निवडणूक आयोग आणि जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात दाद मागणार आहेत.

त्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आहे. मी यांना घाबरणार नाही.. मी अबला नाही. महिला दुर्गेचे रुप असते. मी महिषासुराचा नाश करेन. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे तुम्ही कोम. हे बेटी बचाव, बेटी पढावच्या गप्पा करतात. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे ते कोण आहेत, असा हल्लाबोलही बर्वे यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल