सीबीआयला १३,०४३.५७ कोटीचा बुडीत घोटाळयांची चौकशीला सरकार परवानगी का देत नाही ?

मुंबई – राष्ट्रीयकृत बँकांचे विविध कंपन्यांनी सुमारे १३,०४३.५७ कोटी रुपये बुडविले असून याप्रकरणी गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याची परवानगी सीबीआयने राज्य सरकारकडे मागितली आहे. मात्र, ही परवानगी का देत नाही ? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्याची तातडीने दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या यादीसोबत अन्‍य प्रलंबित केसची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला देण्यात येईल असे जाहिर केले.

राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकामधून विविध कंपन्यांनी कर्ज घेऊन ते बुडविले. सदर प्रकरणी सीबीआयकडे विविध बँकांनी तक्रारदाखल केल्या असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागत आहे मात्र सरकारने ही परवानगी दिलेली नाही त्यामुळे या चौकश्या होऊ शकत नाही. नागरिकांचा पैसा बुडविणा-या चौकश्यांना सरकार का रोखते आहे असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी करित १२ बँकांची नावे तपशीलासह सादर केली.