झाशीच्या राणीसारखं लढणार, शिवसेनेला कधीही सोडणार नाही – शुभांगी पाटील

नाशिक – महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी काल झाली. यात नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील ( Shubhangi Patil) यांचा पराभव केला.

या निकालावर प्रतिक्रिया देताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, 40 हजार मते पडणं एक सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील झालं नाही. पण पाच जिल्ह्यातून 40 हजार मतं मिळत असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते, महाविकास आघाडीचे आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे.

ज्यांनी 15 वर्ष म्हणजेच तीन टर्म काय हे सगळ्यांना माहित आहे, आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिणींना सोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार. असं पाटील यांनी म्हटले आहे.

https://youtu.be/X_lsi1Lbh_w