एमएस धोनी पुढील हंगामात खेळत राहणार का? CSK कडून मोठे अपडेट

MS Dhoni: IPL 2023 चा पहिला क्वालिफायर सामना आज (23 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल.

गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामना चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईने या मैदानावर हंगामातील 7 लीग सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चेन्नईने 4 जिंकले आहेत. अशा परिस्थितीत चेन्नई आपल्या घरच्या मैदानावर गुजरातसमोर आव्हान उभे करू शकते.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन (Kashi Vishwanathan) यांनी महेंद्रसिंग धोनीबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. काशी विश्वनाथन यांनी आशा व्यक्त केली की धोनी खेळत राहील आणि संपूर्ण देशालाही त्याने आपला खेळ सुरूच ठेवलेला पहायचं आहे असं ते म्हणाले.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने IPL 2023 चे 14 लीग सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 10 डावात फलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने 51.50 च्या सरासरीने आणि 190.47 च्या स्ट्राईक रेटने 103 धावा केल्या. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 32 अशी आहे.