क्रौर्याची हद्द झाली : महिलेने कुत्र्यावर अॅसिड फेकले; एक डोळा निकामी झालेल्या कुत्र्यावर उपचार सुरु

Mumbai – मुंबईतील (Mumbai) एका महिलेने चक्क कुत्र्यावर अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित कुत्रा हा घरात पाळलेल्या मांजरींसोबत (Casts) खेळतो आणि त्यांच्या मागे लागतो, त्रास देतो या कारणावरुन महिलेने कुत्र्यावर अॅसिड हल्ला केल्याचं समोर आलं.एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

मालवणीमधील सामनानगर परिसरातील स्वप्नपूर्ती या इमारतीमध्ये हल्ला करणारी महिला राहते. सबिस्ता सुहेल अन्सारी असं महिलेचं नाव आहे. या 35 वर्षीय महिलेकडून कुत्र्यावर अॅसिड अटॅक करण्यात आला. ही घटना बुधवारी (16 ऑगस्ट) रात्री उशिरा घडली. महिलेच्या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

या हल्ल्यात कुत्र्यांला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा एक डोळा निकामी झाला असून शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी कुत्र्याला त्यांच्या थँक यू अर्थ या एनजीओमध्ये नेलं. एनीओद्वारे संचालिक वैद्यकीय केंद्रात कुत्र्याला दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मालवणी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 429, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम 11 (1), आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 119 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.