‘बिकिनी असो, घुंगट असो, जीन्स किंवा हिजाब असो…’; ‘त्या’ ट्वीटमुळे प्रियांका वाड्रा झाल्या ट्रोल

नवी दिल्ली- शाळेत हिजाब घालण्यावरून सुरू झालेला वाद कर्नाटकात आता सर्वदूर पसरला आहे आणि चांगलाच चिघळला आहे. याबाबतचे काही video सोशल मीडियावर viral झाल्यानंतर आता कर्नाटकातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने पुढचे 3 दिवस माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.“बिकिनी असो, घुंगट असो, जीन्स किंवा हिजाब असो, आपण काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा,” असं प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.दरम्यान, या पोस्टमुळे प्रियांका वाड्रा यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्कानच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. ओवेसींनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, मुलीच्या आई-वडिलांना मी सलाम करतो. या मुलीने एक आदर्श ठेवला आहे. भीक मागून आणि रोखून काहीही मिळणार नाही. मुलीने अनेक दुर्बल लोकांना हा मोठा संदेश दिला आहे. या मुलीने जे काम केले आहे ते मोठे धाडसाचे काम आहे. ओवेसींना व्हिडीओमध्ये त्या मुलीला धाडसी राहण्यास सांगितले आहे.