हमासशी लढा देत असलेल्या आपल्या सैन्यानं गाझा शहराला संपूर्णपणे वेढा घातला

Israel-Hamas War: हमासशी लढा देत असलेल्या आपल्या सैन्यानं गाझा शहराला संपूर्णपणे वेढा घातला असल्याचं इस्रायली लष्करी अधिकार्‍यांनी म्हटलं आहे. हमासच्या लष्कराचा तळ असलेल्या गाझा शहरामध्ये; भूमिगत बोगदे, बंकर आणि कमांड सेंटरच्या मोठ्या जाळ्याचा समावेश असल्याचा दावा इस्रायली लष्करानं केला आहे.

दरम्यान पॅलेस्टिनी मृतांची संख्या 9 हजारच्या वर गेली आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांना मदत करण्यासाठी किमान काही काळ तरी हल्ले कमी करावेत आणि गाझाचा वेढा शिथील करावा यासाठी अमेरिका आणि अरब नेत्यांनी; इस्रायलवरचा दबाव वाढवला आहे.

इस्रायलमधील हमासच्या प्राणघातक हल्ल्यामुळे युद्धाला सुरुवात झाल्याच्या सुमारे चार आठवड्यांनंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी – युद्धाला मानवतावादी दृष्टिकोनातून विराम देण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन; आज इस्रायल आणि जॉर्डनमध्ये चर्चेसाठी जाणार आहेत. दरम्यान बायडेन प्रशासनानं इस्रायलला गाझामध्ये अधिक मदत पोहोचवण्यासाठी भाग पाडलं आहे.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे