शरद पवार गटाच्या हाती मुंबईत भोपळा? लोकसभेच्या जागावाटपाचे नेमके गणित काय ?

Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. काही जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी तर काही जागांवर शिवसेना आणि काँग्रेस चर्चेतून तोडगा काढणार आहे. मात्र, मुंबईत महाविकास आघाडीत कुणाच्या वाट्याला किती जागा मिळाल्या याचीच सध्या जोरदार चर्चा आहे.

मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मुंबईतील जागा वाटपात चार दोन असा फॉर्म्युला वापरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाच्या वाट्याला चार जागा आल्या असून काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. या जागा वाटपात शरद पवार गटाला मुंबईतील एकही जागा देण्यात आलेली नाही.

मुंबईत शरद पवार गटाचं तसं फारसं अस्तित्व नाही. महापालिकेतही त्यांची दोन अंकी संख्या निवडून येत नाही. त्यामुळे शरद पवार गटाला मुंबईत एकही जागा सोडण्यात आलेली नाही. या उलट पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा सोडण्यात आल्या आहेत.टीव्ही ९ मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-