जगात तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? भारत देश ‘या’ क्रमांकावर

कोणत्या देशात तंबाखूचे (Tobacco) सर्वाधिक उत्पादन होते आणि कोणत्या देशातील लोक सर्वाधिक धुम्रपान करतात, हा एक अतिशय मनोरंजक प्रश्न आहे. दरवर्षी मे महिन्याच्या ३१ तारखेला जग ‘नो तंबाखू दिवस’ साजरा करते. दरवर्षी ही तारीख येते आणि लोक धूम्रपान कमी करण्याची शपथ घेतात, पण घडते उलटे. तंबाखू सेवनाचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे आणि अधिकाधिक लोक सिगारेटचे शौकीन होत आहेत.

सर्वात मोठा तंबाखू उत्पादक देश
या बाबतीत चीन आघाडीवर आहे. जगात दरवर्षी ६,६६५,७१३ टन तंबाखूचे उत्पादन (Tobacco Production) होते. यामध्ये एकट्या चीनचा वाटा २,८०६,७७० टन इतका आहे. याबाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात दरवर्षी ७,६१,३१८ टन तंबाखूचे उत्पादन होते. जगात वापरल्या जाणार्‍या तंबाखूपैकी ५० टक्के तंबाखू एकट्या भारत आणि चीनमध्ये तयार होते.

कुठे लोक सर्वाधिक धूम्रपान करतात
चीनमध्ये सर्वाधिक तंबाखूचे उत्पादन होते, त्यामुळे चीनमधील लोक या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चीनमध्ये सुमारे ३०० दशलक्ष लोक धूम्रपान करतात. निम्म्याहून अधिक चिनी तरुण सिगारेट आणि बिडी ओढतात. भारत देखील मागे नाही, येथील सुमारे २७.२० टक्के लोक या ना त्या मार्गाने तंबाखूचे सेवन करतात.

कुठे लोक कमी तंबाखू वापरतात
स्वीडन, आइसलँड, फिनलंड, नॉर्वे, लक्झेंबर्ग येथे राहणारे लोक तंबाखूचा जास्त वापर करत नाहीत. या देशांतील लोक स्वतःमध्ये मग्न राहतात. एकूण लोकसंख्येपैकी केवळ 9-10 टक्के लोक तंबाखूचा वापर करतात.