पाण्यात बिस्कीट घालून भागवत होता पोटाची भूक,आता मात्र समस्त पुणेकरांना त्यांच्या हातचाच चहा लागतो

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि चहावाला पंतप्रधान झाला असा गाजावाजा संपूर्ण जगात झाला. मोदीजीची प्रेरणा अनेक चहावाले उदयास आले. पण काहीना परिस्थिती चहावाला बनविते. पण आपल्या व्यवसायाचा जर बारीक अभ्यास केला तर त्यातून अनेक गोष्टी होऊ शकतात. आज आपण पुण्यातील अशा प्रसिद्ध चहावाल्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत, ज्याने आपला चहा एका टपरीपुरता मर्यादित न ठेवता, त्याला एक ब्रॅंड बनविला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा व्यक्ती सर्वात श्रीमंत चहावाला आहे. पुण्यातील नवनाथ येवले यांची ही यशोगाथा.

नवनाथ यांना चहाचे प्रचंड वेड होते. पण त्यांना एकदम कडक आणि उत्तम चहाच आवडायचा , त्यांना आवडत होता तसा चहा फार कमी ठिकाणी मिळत. यातूनच येवले चहाची आयडिया जन्मास आली. नवनाथ यांनी या आवडीतून स्वताचे येवले टी हाऊस हे चहा विण्याचे दुकान सुरू केले. ते स्वता असल्ल चहा शौकीन असल्यामुळे त्यांच्या हातची चव अनेकांना आवडली. त्यांच्या टी हाऊस जवळ गर्दी होऊ लागली. एकदा चहा पिऊन गेलेला माणुसस पुढच्या वेळी आणखी दोन माणसाला घेऊन यायचा. असा येवले टी हाऊसचा नावलौकिक झाला.

नवनाथ यांना  आणखी चार- पाच माणसे हाताखाली ठेवावे लागली. काही दिवसांतच त्यांनी त्यांच्या दुकानाची आणखी एक शाखा काढली. नवनाथ चहाचा व्यवसाय तर करत होतेच पण ग्राहकांना काय आवडते, चहामध्ये कोणते पदार्थ असावेत यांचा देखील अभ्यास सुरू होता. यातूनच त्यांच्या डोक्यात येवले अमृततुल्यची कल्पना आली. संपूर्ण पुण्यात त्यांनी येवले अमृततुल्यची चेन सुरू केली.

आज संपूर्ण पुण्यात जोगो-जागी तुम्हाला येवले अमृततुल्यच्या शाखा दिसतील, प्रत्येक सेंटरवर तुम्हाला चहाची अगदी एक सारखी चव मिळेल.नवनाथ याची वार्षिक उलाढाल तब्बल 40 कोटी इतक्या रुपयांची आहे. नवनाथ जेव्हा मागे वळून त्यांच्या प्रवासाकडे बघतात तेव्हा ते भावुक होतात, ते म्हणतात एक काळ असा होता जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा बर्फी विकत घेण्याइतके पैसे देखील माझ्याकडे नव्हते. 2 रुपयांचे बिस्किट पाण्यात घालून आम्ही खायचो.