Nilesh Lanke | जनभावना कार्यकत्यांचा कौल घेतल्यानंतर निवडणूक लढवायाची की नाही ठरवणार

Nilesh Lanke | पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार (Ajit Pawar) गटातून राकाँ शरद पवार (Sharad Pawar) गटात सामील होताच शुक्रवार दि. १५ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे आपल्या हजारो कार्यकत्यासह येवून श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तिर्थक्षेञी त्यांचे तुतारीच्या निनादात फटाक्यांच्या प्रचंड अतिषबाजीत स्वागत झाले. यावेळी तिर्थक्षेञ तुळजापूरात त्यांच्या समर्थकांनी स्वागतासाठी लावलेल्या फलकात भावी खासदार हा उल्लेख अनेकांच्या भुवया उंचविणा-या होता. नंतर थेट श्रीतुळजाभवानी मंदीरात जावून मनोभावे दर्शन घेवून यथासांगा पुजा केली. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारिक पुजारी प्रविण (केशव) कदम यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अँड धिरज पाटील (Dhiraj Patil) जनसेवक अमोल कुतवळ सह राकाँ शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

देवीदर्शनानंतर पञकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मी श्रीतुळजाभवानीचा भक्त आहे. सातत्याने देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो. मी राजकिय घराण्यातून आलो नाही, तरीही कार्यकत्यांचा जीवावर मी आमदार झालो. मी हारणा-या मधील खेळाडू नाही, असे खासदारकी बाबतीत बोलताना म्हणाले.

देविने साक्षात्कार दिल्यास जनभावना व कार्यकत्यांची मते घेवून लोकसभा लढवायाची कि नाही हे ठरवणार असल्याचे म्हणाले. भावी खासदार असे बँनर झळकतायत असा प्रश्न केला असता माझा कार्यकत्यांना वाटते मी मोठा व्हावा त्यात काय वावगं आहे असे सांगून अप्रत्यक्षपणे आपण लोकसभेसाठी इछुक असल्याचे स्पष्ट केले. डाँ सुजय विखेचे आवाहन किती? यावर बोलताना ते म्हणाले कि देशाच्या सर्वौच्य नेत्या इंदिरा गांधी पराभूत झाल्या हे लक्षात घ्या. माझ्या पुढे आवाहने नसतात, असे यावेळी म्हणाले

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यावेळी राजेंद्र माने, सुनील शिंदे ज् छोटू काका पाटील, विकास बापू चव्हाण, संतोष मुद्गुले, जनार्दन माने, औदुंबर करंडे पाटील, जबर भाई शेख, पप्पू कांबळे वसीम शेख, पप्पू पवार, अण्णा गुंडगिरी, गणेश खोमणे, प्रमोद भोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे