‘दिल्ली तुम्ही घ्या नि गुजरात आम्हाला द्या’, BJP-AAPची ‘डील’; संजय राऊत यांचा आरोप!

मुंबई – कॉंग्रेसला गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला आहे. हिमाचल सुद्धा भाजपकडे जाईल असं सांगितले जात असताना शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र भाजपा (BJP) आणि आप (AAP) या दोन पक्षांना फैलावर घेतले आहे. दोन पक्षांनी आपसांत ‘डील’ केल्याचा आरोप त्यांनी केली.

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने इतर पक्षांसोबत चर्चा करून सामंजस्याने निवडणूक लढवायला हवी होती. पण बहुतेक दिल्ली तुम्ही घ्या आणि भाजपा आम्हाला द्या अशा पद्धतीचे ‘डील’ झाले असावे अशी लोकांना शंका असल्याचा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केला.

हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल. देशाच्या पुढील निवडणुकीत आशादायक चित्र आहे. पण विरोधकांनी मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. गुजरात निकालाचा संदर्भ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेशी लावणं चुकीचे आहे. असं ते म्हणाले.