आम्ही हृदयाची धडधड थांबवू शकत नाही; २६ आठवड्यांच्या गर्भपाताची परवानगी SC ने नाकारली

26-week pregnant wife’s abortion petition rejected : सर्वोच्च न्यायालयानं आज एका २६ आठवड्याच्या गरोदर विवाहितेची गर्भपातासंबंधातली याचिका फेटाळली. न्यायालय जीवन संपवण्याची परवानगी देऊ शकत नाही असं सांगत  सर्वोच्च  न्यायालयानं या महिलेची याचिका फेटाळली. याचिकाकर्ती महिला नैराश्यग्रस्त असून भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या तिसऱ्या मुलाचं संगोपन करण्याच्या स्थितीत नाही तसंच या महिलेला पूर्वीची  २ मुले आहेत. त्यामुळे गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

महिला २६ आठवडे ५ दिवसाची गर्भवती आहे. जर गर्भपाताला परवानगी दिली तर वैद्यकीय गर्भपात कायद्याच्या सेक्शन ३ आणि पाचचे उल्लंघन ठरेल. कराण, या गर्भधारणेमुळे आईच्या जीवाला कोणताही धोका नाही. तसंच, गर्भात असलेले बाळ विकृतही नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी म्हटलं. आम्ही हृदयाची धडधड थांबवू शकत नाही, असंही ते पुढे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

दोन अपत्ये असलेली २७ वर्षीय महिला तिसऱ्यांदा गर्भवती आहे. तिच्या दुसऱ्या बाळाला अद्याप एक वर्षही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे आपण मानसिक, शारिरीक आणि आर्थिकदृष्ट्या तिसऱ्या बाळाला जन्माला घालण्यास असमर्थ आहोत, असं या महिलेने याचिकेद्वारे न्यायालयात सांगितले. त्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी तिने केली. ती सध्या २६ आठवड्यांची गर्भवती असून वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार २४ आठड्यांपर्यंतच गर्भपाताची परवानगी दिली जाते. तेही गर्भातील बाळात काही व्यंग असेल किंवा गर्भवतीच्या जीवाला धोका पोहोचणार असेल किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय कारणासाठीच गर्भपाताची परवानगी दिली जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा