संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचारप्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे – महेश तपासे

मुंबई – संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयात एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर हे प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्याचे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे. दरम्यान अशा भ्रष्टाचाराला व भ्रष्टाचार करणार्‍या मंत्र्यांला पाठीशी घालणार की त्याची मंत्री पदावरून हकालपट्टी करणार हे जनतेसमोर जाहीर करावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.