ऑलिंपिकमधे टी-२० क्रिकेटसह ५ नवीन खेळांचा समावेश; पहा आणखी कोणत्या खेळांचा करण्यात आला आहे समावेश

Inclusion of 5 new sports including T20 Cricket in Olympics : ऑलिंपिक खेळांमध्ये टी-ट्वेंटी क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करायला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेनेने मंजुरी दिली आहे. मुंबईत सुरु असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉस एंजेलिस इथं 2028 मध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्स मध्ये आता टी ट्वेंटी क्रिकेट, बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल, लॅक्रोज, फ्लॅग फूटबॉल आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश होईल.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेच्या या निर्णयाचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वागत केलं आहे. स्क्वॅश आणि क्रिकेट या भारतात लोकप्रिय असणाऱ्या दोन्ही खेळांचा ऑलिंपिकमध्ये समावेश झाल्याने या खेळांची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा