रामदास आठवलेंच्या नेतृत्वात बौद्धांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची उद्या भेट घेणार

मुंबई – राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची नवि दिल्लीत राष्ट्रपती भवनात (President House) उद्या दि.30 मे रोजी सकाळी 11 वाजता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध प्रतिनिधी आणि धम्मगुरु बौद्ध भिक्खुंचा समावेश असणारे बौद्धांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची सदिच्छा भेट घेणार आहेत.

राष्ट्रपती महामहिम श्री  रामनाथ कोविंद  यांनी  राष्ट्रपती पद स्वीकारून 5 वर्षांचा कार्यकाळ  अत्यंत उत्कृष्टरित्या पूर्ण केला असल्याबद्दल बौद्ध भिक्खुंच्या वतीने राष्ट्रपतींचे अभिनंदन करण्यात येणार असून आगामी काळात नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या बौद्ध भिख्खूंच्या अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण बौद्ध भिक्खू राष्ट्रपतींना देणार आहेत.

दिवंगत माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात अनुसूचित जातीतून बौद्ध धम्म स्वीकारलेल्या बौद्धांना अनुसूचित जाती च्या सवलती देण्याचा निर्णय केंद्र सरकार ने घेतला होता. मात्र बौद्ध नोंद झाल्यानंतर अनुसूचित जाती च्य सवलती बौद्धांना मिळत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार च्या अनुसूचित जाती च्य यादीत अनुसूचित जातीतून बौद्ध झालेल्या बौद्धांची नोंद केंद्र सरकार च्या अनुसूचित जाती च्या यादीत करावी या मागणीबाबत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे राष्ट्रपतींशी चर्चा करणार आहेत. या तसेच रिपब्लिकन पक्षाच्या पर्यावरण आघाडी च्या वतीने  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देशभरातील पर्यावरण ची सध्यास्थिती बाबतचा एक  अहवाल  राष्ट्रपतींना रिपाइंचे  पर्यावरण आघाडी चे कार्याध्यक्ष विजय ढमाल सुपूर्द करणार आहेत.