पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे पण निवडणूक आयोगाला माहित नाही – Raut

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावर (Election Commission) निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगासमोर दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरु आहेत. शिवसेना कोणाचे आणि राष्ट्रवादी कोणाची, हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनी केलं. पाकिस्तानला (Pakistan) माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे. पण निवडणूक आयोगाला माहित नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील झालेला होता. ज्यांनी बेईमानी केली होती त्यांनी फक्त आमदार पळवले पक्ष नाही. पक्षावर ताबा करण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिली होती. पण इलेक्शन कमिशनने त्याचा संदर्भ घेतला नाही. एकतर्फी निर्णय घेतला. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील तोच प्रश्न उपस्थित होत आहे. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत, तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की राष्ट्रवादी कोणाची असे राऊत म्हणाले. देशाचं दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशनला कळत नाही या पक्षाची मालकी नेतृत्व कोणाकडे आहे.

पूर्वीच्या काळी अशा टोळ्या होत्या, इतिहासात ज्या कबील्यांचा ताब्या घ्यायच्या आणि लुटमार करायच्या. आता अशा राजकारणात भाजपने टोळ्या निर्माण केल्या आहेत. पक्षांचा ताबा घेतला जातोय. घटनात्मक संरक्षण त्यांना दिलं जातंय हे दुर्दैव असल्याचे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर