Jaya Bachchan | ‘ज्या पुरुषाच्या छातीवर केस नाहीत…’, जया बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चनला दिला विचित्र सल्ला

Jaya Bachchan and Shweta Bachchan | बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन जेवढे शांत आहेत, तेवढीच त्यांची पत्नी जया बच्चन रागीट स्वभावाची आहे. जया बच्चन केवळ एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम राजकारणी देखील आहे. जया बच्चन अनेकदा आपले मत मांडण्यास कधीच मागे हटत नाही.

अभिषेक बच्चनने आई जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्याबद्दल असे सांगितले की, जया बच्चन आपल्या दोन्ही मुलांना अभिषेक आणि श्वेता यांना अनेक प्रकारचे सल्ले देत असतात. दरम्यान, अभिषेक बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो म्हणत आहे की त्याची आई बहीण श्वेता बच्चनला अनेक प्रकारचे सल्ले देत असते. कधीकधी हा सल्ला पूर्णपणे विचित्र असतो.

एकेकाळी टीव्हीच्या प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमध्ये पाहुणे म्हणून दिसलेल्या अभिषेक बच्चनने त्याची आई जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. खरंतर, या शोमध्ये कपिल शर्माने उपस्थित सर्व स्टार्सना विचारले होते की, 80 आणि 90 च्या दशकात फिल्मी हिरोच्या छातीवर केस असायचे पण आता असे का होत नाही.

कपिल शर्माचे म्हणणे ऐकून अभिषेक बच्चनने गंमतीत सांगितले होते की, त्याच्या छातीवर केस आहेत आणि आई जया बच्चनच्या सांगण्यावरून त्याने हे असे ठेवले आहेत. याशिवाय अभिषेक बच्चनने त्याची आई आणि बहीण श्वेता यांच्याशी संबंधित एक खास गोष्ट लोकांना सांगितली.

अभिषेक बच्चन म्हणाला, एकदा माझी आई जया बच्चनने माझी बहीण श्वेताला सांगितले होते की, ज्याच्या छातीवर केस नाहीत अशा माणसावर अजिबात विश्वास ठेवू नको. मात्र, आई जयाने बहिणीला असे का सांगितले होते मला अजूनही समजले नाही, असे अभिषेक म्हणाला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते